ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
नर्सिंगमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना कणकवलीमध्ये मोफत मार्गदर्शन कार्यशाळा...!

नर्सिंगमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना कणकवलीमध्ये मोफत मार्गदर्शन कार्यशाळा...!

प्रकाशन: 06 Oct 2021 03:55 PM
वाचन संख्या 153

आरोग्य क्षेत्रातील तज्ञ अधिकारी आणि प्रशासकीय अधिपरिचारीका करणार मार्गदर्शन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी…!

कणकवली | उमेश परब : आज आरोग्य सेवेमध्ये रजिस्ट्रेशन असणाऱ्या परिचारिकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रस्टची मोठी हॉस्पिटल्स व इतर छोट्या हॉस्पिटल्समध्ये नर्सेसची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यापटीत ट्रेंड नर्सची उपलब्धता कमी असल्याने नर्सिंग पेशाचे महत्व अधोरेखित होत आहे. याचा विचार करुन RANM, GNM‌ तसेच BSc Nursing, PBBSc Nursing अशा विविध अभ्यासक्रम घेवू इच्छिणाऱ्या‌ १२वी पास (‍आर्टस् ,कॉमर्स, सायन्स, व व्होकेशनल) विद्यार्थीनींसाठी रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते १.०० या वेळेत आयडीयल नर्सिंग स्कूल नाईक बिल्डिंग, मुंबई – गोवा हायवे कोर्टा शेजारी कणकवली येथे मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिकांद्वारे केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे. 9527558561, 9422381995, 8432547667, 9579197667.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स