ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
उद्यापासून परमहंस भालचंद्र संस्थान दर्शनासाठी होणार खुले..!

उद्यापासून परमहंस भालचंद्र संस्थान दर्शनासाठी होणार खुले..!

प्रकाशन: 06 Oct 2021 07:45 PM
वाचन संख्या 70

शासनाचे आरोग्य विषयक नियम पाळून भविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन


कणकवली | उमेश परब : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुरुवार दि . ०७ ऑक्टोबर २०२१ पासून परमहंस भालचंद्र संस्थान दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे .प.पूज्य भालचंद्र महाराज यांच्या चरणी काकड आरती- गुरुवारी पहाटे ०५:३० वाजता होणार आहे.

तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संस्थान परिसरात प्रवेश करताना मास्क लावणे बंधनकारक आहे . दर्शनाच्या वेळी तसेच आरतीच्या वेळी दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे . संस्थान व परिसरात गर्दी टाळावी . समाधी मंदिर दररोज सकाळी ६:०० वाजता दर्शनासाठी खुले करण्यात येईल . बाबांची दैनंदिन आरती रात्रौ ठीक ८ वाजता होईल . तरी भाविक भक्तांनी वरील सूचनांचे पालन करुन संस्थानला सहकार्य करावे ,असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स