ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओबीसी ऐक्य महापरिषदेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या हस्ते ७ रोजी पुणे येथे उद्घाटन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओबीसी ऐक्य महापरिषदेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या हस्ते ७ रोजी पुणे येथे उद्घाटन

प्रकाशन: 03 Aug 2023 10:31 PM
वाचन संख्या 110

सर्व ओबीसींची उपस्थिती आवश्यक अध्यक्ष कल्याण दळे

कणकवली /प्रतिनीधी गणेश चव्हाण. राज्यातील सर्व ओबीसी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी ऐक्य महापरिषदेचे दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेचे उद्घाटन विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसीचे नेते कल्याणराव दळे असणार आहेत.

राज्यातील ओबीसींच्या अनेक रखडलेल्या प्रश्नासाठी ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा.सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पुणे येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून लेखक तथा साहित्यीक श्रावण देवरे हे आहेत. यावेळी ओबीसीचे नेते ॲड. अण्णाराव पाटील, साहित्यीक प्रल्हाद लुलेकर, माजी आ. ॲड. रामराव वडकुते, प्रख्यात विचारवंत प्रा. सुशिला मोराळे, शेतकरी नेते लक्ष्मण वडले यांचे मार्गदर्शन होणार.

या महापरिषदेत मंडल आयोगाच्या शिफारशींची तंतोतंत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याने ओबीसींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. संविधानिक कलम ३४० नुसार ओबीसींना देशातील प्रत्येक क्षेत्रात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ओबीसींची जात निहाय जनगणना होणे ही काळाची गरज आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करून खाजगीकरणाच्या माध्यमातून ओबीसींचे संविधानिक आरक्षण नष्ट केले जात आहे. एकंदरीत शासक जातीचे एक भयानक षडयंत्र आहे. यासाठी ओबीसींनी तत्परतेने लक्षात घेणे ही काळाची गरज आहे. आदी विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महापरिषदेसाठी ओबीसी नेते व विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याने राज्यातील सर्व ओबीसींनी उपस्थित रहावे असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स