ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री स्वामी समर्थ रुग्णालयात 'होप फाॅर होपलेस मोफत होमिओपॅथिक शिबिर' संपन्न ; १५६ रुग्णांना दिली गेली सेवा.

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात 'होप फाॅर होपलेस मोफत होमिओपॅथिक शिबिर' संपन्न ; १५६ रुग्णांना दिली गेली सेवा.

प्रकाशन: 26 Jul 2023 10:59 AM
वाचन संख्या 173

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर’ मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवासा समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न झाले.

या शिबिरात डॉ. प्रफुल्ल विजयकर व टीमच्या वतीने मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मुकबधीर, शारिरीक व्यंग, मानसिक अधू इत्यादी विकारांवर २० वर्षाखालील मुला मुलींची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. सुमारे १५६ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.

मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ञ संस्थापक डॉ.अंबरीश विजयकर, डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, डॉ.श्वेताली विजयकर, डॉ.क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक आदीसह मंदिर समितीच्या सेवेकर्‍यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवशरण अचलेर, प्रथमेश इंगळे, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, रवी मलवे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स