ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे मागवणे वाडितील २० मुलांना डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनने घेतले दत्तक ; १२ वी पर्यंतच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार.

मसुरे मागवणे वाडितील २० मुलांना डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनने घेतले दत्तक ; १२ वी पर्यंतच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार.

प्रकाशन: 26 Jul 2023 10:41 AM
वाचन संख्या 143

मसुरे | प्रतिनिधी : कोल्हापूर येथील डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशनच्या वतीने मसुरे मागवणेवाडीतील २० मुले शालेय शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. या मुलांना इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च या फाउंडेशन तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे.

मसुरे मागवणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वैद्य यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मसुरे मागवणे येथील वीस मुलांना फाउंडेशन तर्फे बारावीपर्यंत शैक्षणिक साहित्य व मदत देण्याचे डॉ. अनिल कुमार वैद्य आणि जाहीर केले. ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी डॉ. नांदेडकर फाउंडेशनने जाहीर केलेल्या मदती बद्दल उपस्थित शिक्षक व पालकांनी डॉ. वैद्य यांचे आभार मानले. यावेळी पांडुरंग कुलकर्णी, निलेश नाईक, सुरेश परब, संतोष दुखंडे, रवींद्र दुखंडे, दत्ताराम सावंत, विकास बागवे, सिताराम दुखंडे यासह मागवणेवाडीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स