ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तहसीलदार शेतावर ; सावंतवाडी तहसीलदारांचा  शेतीकामात थेट सहभाग...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तहसीलदार शेतावर ; सावंतवाडी तहसीलदारांचा शेतीकामात थेट सहभाग...!

प्रकाशन: 20 Jul 2023 11:05 AM
वाचन संख्या 306

विविध सरकारी योजनांचीही करुन दिली माहिती.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, परवा मंगळवारी पाडलोस केणीवाडा येथे शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात जात बांधावर उतरले. यावेळी चिखलात उतरुन चक्क औत हाकण्यापासून भात लावणीतही सहभाग घेतला. शेतातच बसून न्याहारी व पेज जेवण्याचा आनंदही घेतला. तहसीलदारांच्या सक्रिय सहभागा बाबत शेतकर्‍यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे आज सकाळी शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात आले. केवळ औपचारिकता न करता ते थेट चिखलात उतरले. बैल जोडीचे औत हाकण्या बरोबरच प्रत्यक्ष भात लावणीतही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना शेतीचे महत्व समजावून सांगितले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन केले. भात विक्री तसेच नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळविण्यासाठी सातबारामध्ये ई- पीक नोंद असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
    
महसूल विभागाच्या विविध योजनांचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पकपणे उत्तरे देऊन शंका निरसन केले. यावेळी मंडळ अधिकारी पी. एस. सावंत, तलाठी संदिप मुळीक, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ग्रा. पं. सदस्य काका परब, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, आरोस माजी सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील रश्मी माधव, शेतकरी विश्वनाथ नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स