ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमचा काम 'देवचा' पण किती 'घेवचा' ह्या 'घेणा-या माणसान' ठरवचा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमचा काम 'देवचा' पण किती 'घेवचा' ह्या 'घेणा-या माणसान' ठरवचा..!

प्रकाशन: 20 Jul 2023 12:04 PM
वाचन संख्या 284

देवेंद्र गावडे | उपसंपादक : आघाडिच्या फळीतले मुख्य पाचही फलंदाज ओळीने बाद व्हावेत प्रतिस्पर्धी संघाला विजयाची पूर्ण खात्री वाटावी आणि अचानक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाज कि गोलंदाज अशा काहीशा स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत असणा-या बहुधा हा ‘अष्टपैलू’ खेळाडू असावा असं इतरांनीच त्याला लेबल चिकटवून टाकलेले आहे अशा खेळाडूने धुवाँधार फलंदाजी करत स्वतःच्या संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढत सामना जिंकून द्यावा तसाच हा यंदाचा मानसून तथा ‘आपला पाऊस..!’

सुपरफास्ट एक्स्प्रेस मुळात पहिल्या फलाटावरून सुटायलाच उशिर झालेला असतो आणि तरी देखील पूढचा सगळा प्रवास ही एक्स्प्रेस नावाप्रमाणेच ‘सुपरफास्ट’करते म्हणजे वेळ मेक अप करत मागे राहिलेली वेळ भरून काढत अगदी नियोजित वेळी प्रवाशांना आपल्या अपेक्षित स्थळी पोहचवते तसा हा यंदाचा ‘आपला पाऊस….!’

जून महिना पूर्णपणे रखरखीत अवस्थेत संपला होता विहिर, नदी, ओढे यांचे ‘पाणी’ कधीच सुकून गेले होते म्हणून आता ‘तोंडचं पाणी’ सुद्धा ‘पळतंय’ की काय अशी अवस्था होऊ घातली होती पण ‘त्या’ची कृपा झाली आणि तो पुन्हा तसा तुफानीपणाने बरसला..! ‘तो’ यावर्षी एक महिन्याहून अधिक उशिराने आलाय असे सांगीतले तर आज कुणाचा विश्वास बसणार नाही इतक्या मुक्तपणे तो कोसळतोय..!

एका मराठी मनोरंजन वाहिनीवर सोमवारपासून एक मालिका ‘श्रीक्षेत्रपाल वेतोबा ‘ सुरू झाली आहे त्यात पहिल्याच भागात एक सुंदर संवादाची ओळ आहे. श्री देव वेतोबा म्हणतात,” आमचा काम ‘देवचा’..किती ‘घेवचा’..ह्या ‘घेणा-या’ माणसान ठरवक होया..!”

आतातरी ध्यानात येवकच होया….’माणसाच्या..!’

देवेंद्र गावडे ( उपसंपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल )

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स