ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट मध्ये घुसले ; सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली परिस्थितीची पहाणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट मध्ये घुसले ; सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली परिस्थितीची पहाणी.

प्रकाशन: 19 Jul 2023 11:18 PM
वाचन संख्या 153

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जातीने बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत. त्यांनी तब्बल दोन तास याठिकाणी थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्यात. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी त्यांनी पुरस्थितीची माहिती जाणून घेतली. शहरातील पूर बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.

यावेळी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तलाठी फिरोज़ ख़ान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत बांदेकर, शिरसाट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स