ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कलमठ मध्ये रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न ; कै. दीपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय स्मृती दिना प्रित्यर्थ केले गेले आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कलमठ मध्ये रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न ; कै. दीपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय स्मृती दिना प्रित्यर्थ केले गेले आयोजन.

प्रकाशन: 10 Jul 2023 02:41 PM
वाचन संख्या 201

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कलमठ येथे ८ जुलैला कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर ग्रामपंचायत हॉल ( कलमठ ) येथे आयोजित केले गेले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंच श्री संदिप मेस्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर सर, मा. पं. स. महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य नितिन पवार, धीरज मेस्त्री, दिनेश गोठणकर, अनूप वारंग, वैभववाडी- कणकवली विभागीय संघटक मकरंद सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष अमोल भोगले, कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, जिल्हा सदस्य विठ्ठल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आबा कोरगावकर, विजय चिंदरकर, विनय हडकर, श्री केशव पावसकर, श्री ज्ञानेश्वर काळे, श्री प्रदिप सावंत, श्री दीपक महाडिक आदी उपस्थित होते.

रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ७५ रक्तदात्यांनी हजेरी लावली त्यापैकी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १० रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. यावेळी रक्तदात्यांना सुपारीची रोपे देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, अक्षय मोरे, दिपेश सावंत, किरण सामंत, स्नेहल हजारे, दुर्गाप्रसाद काजरेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार पावसकर, योगेश जाधव, सर्वेश राणे, सदाशिव(बाबू) राणे, माणिक वाघमारे, योगेश चव्हाण, आशिष राणे आदींनी प्रयत्न केले. या शिबिरासाठी श्री देव काशिकलेश्वर सभागृह कलमठ ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत कलमठ आणि जिल्हा रुग्णालय, रक्तपेढीने वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स