ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आदर्श व्यापारी शंकर उर्फ भाऊ वळंजू यांचा बांद्यात सन्मान.

आदर्श व्यापारी शंकर उर्फ भाऊ वळंजू यांचा बांद्यात सन्मान.

प्रकाशन: 10 Jul 2023 05:51 PM
वाचन संख्या 207

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्यापारी श्री. भाऊ वळंजू यांचा राज्य वस्तू व सेवा कर विभाग ओरोस यांनी विहित मुदतीत विवरणपत्र दाखल करून सर्वाधिक वस्तू व सेवा कराचा भरणा करणारे ‘आदर्श व्यापारी’ म्हणून नुकताच सन्मान केला.

या मिळालेल्या सन्मानाबद्दल बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद ख़तीब यांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. जिल्ह्यात विहित वेळेत सर्वाधिक कर भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना गौरविण्यात येते. यामध्ये वळंजू यांचा समावेश आहे. बांदा शहरासाठी हे भूषणावह असल्याचे सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स