चाफेड गावठण येथील सूर्यकांत भिवा राणे यांचे निधन.
शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड
देवगड तालुक्यातल्या चाफेड – गावठण येथील रहिवाशी सूर्यकांत भिवा राणे ( वय ७२ ) यांचे गुरुवारी ६ जुलैला रात्री ११.३० च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात भावजय, दोन विवाहित मुलगे, सुना, दोन विवाहित मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच आकाश राणे यांचे ते सख्खे काका होत. सूर्यकांत राणे यांच्या निधनाने चाफेड व साळशी परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)