ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई स्वतः पोहोचल्या शेतबांधावर..!

वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई स्वतः पोहोचल्या शेतबांधावर..!

प्रकाशन: 10 Jul 2023 07:20 AM
वाचन संख्या 197

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वैभववाडी तालुका तहसीलदार दिप्ती देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. वैभववाडी येथील माईणकरवाडीत शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन त्यांनी स्वतः पिकांची माहिती घेत ई पीक पाहणी केली.

राज्यात १ जुलै पासून ई पीक पाहणी मोहीमेला सुरुवात झाली आहे. शेतक-यांनी मोबाईल ॲपद्वारे आपल्या सातबारावर पीक नोंदणी करायची आहे. या मोहीमेची माहिती देण्यासाठी स्वतः तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.
येथील माईणकरवाडीत भात लावणीचे काम सुरू होते. याठिकाणी सौ.देसाई यांनी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मोबाईलद्वारे पीक नोंदणी कशी करायची याची माहिती दिली.

यावेळी वाभवे तलाठी केदार बागल, एडगांव तलाठी राजेंद्र चरापले, कोतवाल संतोष काळे व शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स