ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा येथे प्रसिद्ध मानसोपचार तज डॉ. रुपेश पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ; व्ही.एन. नाबर प्रशालेत संपन्न झाला विशेष मार्गदर्शन वर्ग.

बांदा येथे प्रसिद्ध मानसोपचार तज डॉ. रुपेश पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ; व्ही.एन. नाबर प्रशालेत संपन्न झाला विशेष मार्गदर्शन वर्ग.

प्रकाशन: 09 Jul 2023 09:47 AM
वाचन संख्या 170

सोशल मीडिया वरील उदाहरणांवरून प्रेम, वासना व आकर्षण यांतील फरक आणि विविध घातक व्यसनां विषयी केले सामूहीक समुपदेशन.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्ही. एन. नाबर शाळेत कुमारवय व ंचे मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शक वर्ग व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत बांदा पंचक्रोशीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन वर्गा दरम्यान ंनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील ंचे अनुभव व विविध उदाहरणे देऊन ंनी आपले विषय मांडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की विद्यार्थ्यानी आपापल्या क्षमता ओळखल्या पाहिजे व ंचे रूपांतरण करून विकसित केल्या पाहिजेत. मुळे आपला आत्मविश्वास वाढतो. चप्रमाणे आपल्या मर्यादा ओळखून वागले पाहिजे. तसेच ंनी अल्कोहोल व सबस्टन्स डिपेंडन्स सिंन्ड्रोम या आजारांविषयी माहिती दिली. या आजारामुळे अनेक कुमारवयीन मुले, प्रौढ व्यक्ति दारूच्या आणि सिगारेटच्या आहारी जातात व मरण पावतात . समाजातील विविध उदाहरणे देऊन देऊन सांगितले की या आजाराचे निदान नाही पण दारू आणि सिगारेट पासून दूर राहून आपण हे आजार टाळू शकतो. याचबरोबर आपल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण ठाम राहिले पाहिजे. असाही सल्ला दिला.

नंतर ंनी सोशल मीडिया वरील उदाहरणांवरून प्रेम, वासना व आकर्षण या मधील फरक समजावून सांगितला. आपल्या व्यक्तीचे चांगले व्हावे असे वाटणे म्हणजे प्रेम, पण एखादी व्यक्ति हवी हवीशी वाटणे, सतत तिचा विचार असणे फसवणूक झाल्यावर मग अस्वस्थपणा वाटणे हे आकर्षण. आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. हा गुन्हा नाही पण आपल्याला यातला फरक कळला पाहिजे. आपण आपल्या भावना ओळखणे, समजावून घेणे तसेच समोरच्याच्या भावना ओळखून आपण स्वतःचा बचाव करू शकतो असेही डॉ पाटकर म्हणाले. अतिशय सोप्या शैलीत डॉ पाटकर यांनी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले या बद्दल प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती रसिका वाटवे यांनी ंचे आभार मानले . या मार्गदर्शन वर्गाला प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगांवकर तसेच इतर शिक्षकही उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स