ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिव्य ज्योती प्रशालेत पदवी समारंभ उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिव्य ज्योती प्रशालेत पदवी समारंभ उत्साहात साजरा.

प्रकाशन: 09 Jul 2023 11:54 AM
वाचन संख्या 156

बांदा /राकेश परब : आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. क्षेत्र कोणतेही असो त्यात स्पर्धा ही आहेच. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असले पाहिजे. आपल्यातील गुणवत्ता शोधून त्या क्षेत्रात प्रगती साधा. तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने तुमच्यातील संधी व कमतरता यांचा अभ्यास करा आणि तुमच्यातील कमतरतेचे गुणवत्तेत रूपांतर करा. तुमच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा वेळोवेळी तुम्हा विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, त्या संधीचं सोनं करा. शाळेतील शिस्त व गुणवत्ता टिकविण्यासाठी ज्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली आहे त्यांनी कर्तव्यदक्षतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि आपल्या प्रशालेचे नाव उज्वल करा, असे विचार असे उद्गार अल्फोंसा स्कूलचे माजी मुख्याध्यापक फादर लिजो यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. बांदा येथील देगवे ( पानवळ) येथील दिव्य ज्योती येते संपन्न झालेल्या पदवी संपादन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. शनिवारी ८ जुलैला प्रशालेच्या सभागृहात विद्यार्थ्यांचा पदारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आल्फोन्सा स्कूल शाहूवाडी चे माजी मुख्याध्यापक फादर लिजो, दिव्य ज्योती स्कूलचे मुख्याध्यापक फादर बॅनेट, प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा असिस्टंट मॅनेजर फादर लिओ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २०२३/२४ या शैक्षणिक वर्षाच्या फनएथन या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच प्रशालेच्या विविध कार्यकारणीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ऑलिंपियाड परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये राज्यामध्ये गुणवत्ता मिळवलेल्या कुमार मेघराज गवस, कुमारी अस्मी आईर तसेच कुमार अथर्व चिपळूणकर यांना प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरवण्यात आले. इंडियन टॅलेंट ओलिंपियाड परीक्षेत दिव्य ज्योती प्रशालेने उत्तम प्रतिसाद व भरघोस यश मिळवल्याबद्दल प्रशालेला गोल्डन स्कूल अवार्ड देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा सन्मान प्रशालेचे प्रिन्सिपल फादर बेनेट यांनी स्वीकार केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी कु. स्वरा सातार्डेकर व कु. खुशी शेख यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशालेचा विद्यार्थी प्रतिनिधी क्लिंटन फर्नांडिस याने केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स