ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठवपुराव्याने मालवणातील जि.प. विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या पाठवपुराव्याने मालवणातील जि.प. विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर..!

प्रकाशन: 07 Jul 2023 04:45 AM
वाचन संख्या 510

आ.वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व इतर पदाधिकारी व शिवसैनिकांसह केली प्रगती पथावरील कामांची पहाणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ‘जिल्हा परिषद सेस फंडातून’ मालवण बंदर जेटी तथा धक्क्याच्या जवळ असलेल्या जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी १५ लाख रु मंजूर झाले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात मालवण तालुका अग्रेसर आहे. याठिकाणच्या पर्यटनात वाढ करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न सुरु आहेत. मालवण बंदर जेटी नजीक असलेले जि. प. चे विश्रांतीगृह नादुरुस्त असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती त्यानुसार या कामासाठी १५ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. याआधी आ. वैभव नाईक यांनी मालवण मधील प्रसिद्ध आरसेमहाल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीसाठी देखील कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणला असून प्रत्यक्षात ही कामे प्रगती पथावर आहेत. आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी या तिन्ही कामांची पाहणी केली. यावेळी अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यक सूचना त्यांनी केल्या.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपशहरप्रमुख सन्मेष परब, तपस्वी मयेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. सावर्डेकर, शाखा अभियंता श्री. मगर व श्री. पवार, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स