ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना ; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली पुलाच्या कामाची पहाणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना ; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली पुलाच्या कामाची पहाणी.

प्रकाशन: 07 Jul 2023 05:55 AM
वाचन संख्या 286

आमदार वैभव नाईक यांनी म. वि. आ. सरकारच्या काळात आंबेरी पुलासाठी ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी घेतला होता मंजूर करून…!

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन आंबेरी पुलावरून वाहतूक सुरु करण्याची सूचना काल आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता सीमा गोवेकर, शाखा अभियंता श्री. पाटील यांना दिली. याच दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलाची पाहणी देखील केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, बंड्या कुडतरकर आदी उपस्थित होते.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आंबेरी पुलासाठी बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून घेतले होते या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आलेली नाही. याठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच सध्या वाहतूक सुरु आहे हा जुना पूल जीर्ण झाला असून पावसाचा जोर वाढला असल्याने तो पूल पाण्याखाली गेल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून नवीन पुलाच्या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन पुलावरून वाहतूक सुरु करण्यात यावी अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स