ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एडगांव येथे कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना भरड धान्य बियाण्यांचे वाटप ; आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य.

एडगांव येथे कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना भरड धान्य बियाण्यांचे वाटप ; आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य.

प्रकाशन: 06 Jul 2023 09:02 AM
वाचन संख्या 429

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या एडगांव, वायंबोशी गांवात कृषी विभागा मार्फत मोफत नाचणी या भरड धान्य बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, पंढरी रावराणे, पुरुषोत्तम रावराणे, ग्रामसेवक श्री घुगे, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष जाहीर झाले आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी केंद्राने हा उपक्रम चालु आहे. पूर्ण तालुकाभर या भरड धान्या विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, कुट्टू, राजगिरा, कोंदरा, कुटकी, वरी, राळा या धान्याचा समावेश आहे.
वैभववाडी तालुक्यात जिथे भरड धान्य पिकवल जाईल त्या गावातील शेतकऱ्यांचा वैभववाडी ता.ख.वि.संघा मार्फत सन्मान, तसेच भरड धान्याचे उपयोग करून विविध पीठ तयार करणाऱ्या गृह उद्योग संस्थां व बचत गटांचा ही सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रमोद रावराणे यांनी सांगितले. वैभववाडी खरेदी विक्री संघा मार्फत लवकरच मिलेट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स