ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री. रामचंद्र पाटील यांचा कोकण रत्न म्हणून सन्मान ; कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून झाला गौरव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री. रामचंद्र पाटील यांचा कोकण रत्न म्हणून सन्मान ; कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून झाला गौरव.

प्रकाशन: 06 Jul 2023 10:17 AM
वाचन संख्या 269

बांदा | राकेश परब : श्री. रामचंद्र पाटील यांनी गेले चार दशके केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना आज कोकण रत्न या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. नायर हॉल दादर मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात संस्थेचे मार्गदर्शक श्री श्रीराम कुबल, व्यावसायिक श्री योगेश भोसले, लेखक दिग्दर्शक सुदर्शन गमरे, आय सी आय सी आयचे व्यवस्थापक सतीश लोखंडे, संस्थेचे खजिनदार प्रेम कुबल अशा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रामचंद्र पाटील यांची शारिरीक समस्या असल्याने त्यांच्या पत्नी सौ. सावित्री रामचंद्र पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी लक्ष्मी गवस यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात साक्षी सांगळे यांच्या टीमने नृत्याविष्कार सादर करून केली या संपूर्ण कार्यक्रमात अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी होती त्यात राजेश खन्ना यांची मिमिक्री करणारे कलाकार, उपस्थितांबरोबर वेगवेगळे मनोरंजनाचे खेळ, नृत्ये आणि विनोदी कलाकार सामील होते. या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष श्री दयानंद कुबल यांचे वडिल श्रीराम कुबल यांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शेकडो सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना दयानंद कुबल म्हणाले की ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे रामचंद्र पाटील हे एक आदर्शवत व्यक्ती आहेत, त्यांच्या कामाची दखल आताच्या पिढीने घेऊन सामाजिक क्षेत्रात कर्तव्य वाजवले पाहिजे. त्यांचा सत्कार करणे हे आमचे भाग्यच आहे, तर साधे राहणीमान आणि समाजभान ठेवणारे श्रीराम कुबल यांचा आदर्श घेऊन कोकण संस्था जनहीताचे कार्य जोमाने करेल असा विश्वास ही त्यांनी या वेळी व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्त्या कु. हर्षला अमूप, सौ.जयश्री खोपकर, कु. स्वाती नलावडे यांनी कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साक्षी पोटे, प्रीती पांगे, सूरज कदम, तारा सांगळे, योगिता मांजरेकर, दर्शना कांबळे, नीता कुबल, विश्वनाथ बेटकर, कोमल कांबळे, श्वेता सावंत, सिंड्रेला जोसेफ, बिना अहिरे, देव कुबल प्रवीण सुतार, लता लोखंडे, विलोकीता पाटील, विजया वाळके, सुनंदा कांबळे अशा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अक्षय ओवळे यांनी केले तर आभार श्वेता चोरगे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स