ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ठाणे मुरबाड येथील 'मंदार कृषी तंत्र निकेतन,कोळींब' यांच्या वतीने 'महाराष्ट्र कृषि दिन' विविध उपक्रमांनी साजरा.

ठाणे मुरबाड येथील 'मंदार कृषी तंत्र निकेतन,कोळींब' यांच्या वतीने 'महाराष्ट्र कृषि दिन' विविध उपक्रमांनी साजरा.

प्रकाशन: 02 Jul 2023 10:37 AM
वाचन संख्या 188

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून १ जुलै रोजी रोजी साजरी होते. या कृषी दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील मंदार कृषी तंत्र निकेतन कोळींब यांच्या वतीने विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे संचालक माननीय श्री अरविंद पोटे, सौ.विजयाताई पोटे, प्राचार्य सौ मीनाक्षी शिंदे मॅडम आणि श्रीमती मनिषा मोरे मॅडम तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्रीमती मनीषा मोरे मॅडम ( आरोग्य विषयक पूर्वकाळजी समुपदेशक Preventive Health Awerness Counsilor) आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मनिषा मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि जैविक शेतीचे फायदे तसेच शेती हा एकविसाव्या शतकातील आधुनिक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे या विषयी मार्गदर्शन केले.

कृषी दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी कृषी दिना विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स