ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेहरू युवा केंद्र आणि कोकण कला व शिक्षण संस्थेकडून जलशक्ती कार्यक्रम संपन्न ; कॅच द रेन विषयावर झाले सखोल मार्गदर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नेहरू युवा केंद्र आणि कोकण कला व शिक्षण संस्थेकडून जलशक्ती कार्यक्रम संपन्न ; कॅच द रेन विषयावर झाले सखोल मार्गदर्शन.

प्रकाशन: 29 Jun 2023 09:57 PM
वाचन संख्या 391

बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी २८ जूनला ‘श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगांव’ येथे शालेय विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले . या कार्यक्रमाचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराव साटम यांच्या उपस्थितीत पार पडले . कोकण संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे . त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी देशभरात जलशक्ती अभियानाची सुरवात झाली आहे. जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या अभियानांतर्गत लोकांपर्यंत जनजागृती व्हावी व भूजल पातळी वाढावी तसेच जलप्रदूषण कमी व्हावे यासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे . या कार्यशाळेसाठी श्री. हनुमंत गवस व श्री. प्रथमेश सावंत यांनी उपस्थितांना जलशक्ती विषयावर सखोल मार्गदर्शन केले . यावेळी प्रशालेतील एकूण ५८ विद्यार्थी-विद्यार्थिनी या माहिती सत्राला उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराव साटम , श्री. प्रशांत कांबळी , श्रीम. प्रणाली परब , श्रीम. वैदेही भोगले , श्रीम. भावना साटम ( प्रतिनिधी –कोकण संस्था ) यांचे सहकार्य लाभले . या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. समिर शिर्के ( जिल्हा समन्वयक – कोकण संस्था ) यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे नेहरू युवा केंद्र सिंदुदुर्ग चे युवा अधिकारी श्री. मोहितकुमार सैनी व कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांचे महत्वाचे सहकार्य लाभले .

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थांनी पाण्याचे महत्व सांगणारी अनेक घोषवाक्ये तयार केली. विद्यार्थ्यांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचा संकल्प केला. आभार प्रदर्शनाने व उपस्थितांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स