ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावण शाळेतील आंदोलनाला ४ दिवस उलटूनही अजून शिक्षकांचा प्रश्न जैसे थे ; ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रचंड नाराजी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्रावण शाळेतील आंदोलनाला ४ दिवस उलटूनही अजून शिक्षकांचा प्रश्न जैसे थे ; ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रचंड नाराजी.

प्रकाशन: 29 Jun 2023 12:57 PM
वाचन संख्या 281

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गांवातील ग्रामस्थ व जि.प.शालेय पालकांनी जो पर्यंत शाळेत शिक्षक संख्या पूर्ण होत नाही पर्यंत शाळेत आमची मुले पाठवणार नाही असा ठाम निर्णय घेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण नं. १ या शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबऊन ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या आंदोलनाला ४ दिवस उलटूनही अजून शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

श्रावण शाळेची शिक्षक संख्या ५ होती. जिल्हा शिक्षक बदली वेळी ५ शिक्षकां मधून शिक्षण विभागाने ३ शिक्षकांची बदली केली. त्या तीन शिक्षकांपैकी दोनच शिक्षक त्या जागेवर दिलेत. एक शिक्षक भरलाच नाही. उलट या २ नविन शिक्षकांपैकी एक उपशिक्षक अमित पवार नावाचे शिक्षक कामगिरी म्हणुन दुसर्‍या शाळेवर पाठवले. पर्यायाने ५ शिक्षकांचे अध्यापन फक्त तीनच शिक्षक करत आहेत. यात शिक्षकांची कसरत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, शाळेचे सर्व पालक व ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन १६ जुन २०२३ रोजी गटशिक्षण अधिकारी यांना संबधित शिक्षकाची कामगिरी रध्द करावी असा अर्ज दिला होता . परंतु अर्ज केराच्या टोपलीत टाकून अर्जाचे अद्यापही लेखी उत्तर न देता, मुख्याद्यापकांना एक मोबाईल संदेश पाठवून त्या पवार शिक्षकांना कामगिरीवर कार्यमुक्त केले. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला काहीही माहिती नाही. नंतर ही माहिती मिळताच, व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामपंचायत यांनी, जो पर्यंत शाळेत कामगिरी शिक्षक परत येत नाही, पर्यंत शाळेत आमची मुले पाठवणार नाहीत. असा पक्का निर्णय श्रावण शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबवून पालकांनी केला. तसेच ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली.

याबाबत शिक्षण विभागाने ४ दिवस अजुनही काही पावले उचललेली नाहीत.याची वरीष्ठांनी लगेच दखल घ्यावी व ग्रामीण भागातील या गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान थांबवावे असे संतप्त आवाहन व नाराजी श्रावण गांवातील ग्रामस्थ व जि प शाळेच्या पालक वर्गातून होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स