साळशी येधे घरावर झाड उन्मळून पडून नुकसान
शिरगाव | संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील साळशी- मिराशी वाडीतील अशोक मिराशी व नंदकिशोर मिराशी यांच्या सामाईक घरावर शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पहिल्याच पावसात जुनाट वृक्ष उन्मळून पडून नुकसान झाले आहे.
साळशी- मिराशीवाडी येथील महापुरुष ठिकाणचा जुनाट वृक्ष अशोक मिराशी व नंदकिशोर मिराशी याच्या घरासमोरील दर्शनीभागाच्या छप्परावर पडून वासे मोडून व कौले फुटून नुकसान झाले आहे.
तसेच या घरासमोर उभी असलेल्या हिरो स्लेंडर एम एच ०७ ऐ क्यू ७८३४ या दुचाकीवरही झाड पडून नुकसान झाले आहे.
सदर घटनेचे वृत्त समजताच साळशी गावच्या पोलीस पाटील कामिनी नाईक यांनी घरमालका समवेत पाहणी करून अहवाल पाठविला आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)