ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शिरगाव येथील सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिरगाव येथील सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रकाशन: 24 Jun 2023 09:02 PM
वाचन संख्या 121

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

शिरगाव | संतोष साळसकर; : कणकवली -देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघ विभाग व आर के फाउंडेशन शिरगावच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे, पी एम किसानची केवायसी करणे, आयुष्यमान भारतचे नवीन कार्ड काढणे, ई श्रम कार्ड काढणे यासारख्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात १७० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला.सायंकाळी उशिरापर्यंत लाभार्थीची गर्दी होती.
यावेळी आमदार नितेश राणे याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थितांंनी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी घरापासून दूर असलेल्या शाळेत जाणा- या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमदार नितेश राणे याच्या वतीने मोफत देण्यात आलेल्या सायकली सहा लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात आल्या.
यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप साटम, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, शिरगाव जि प गट विभाग प्रमुख राजेंद्र शेटे, माजी जि प.सदस्य सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, संतोष कुमार फाटक ,अरविंद पवार, उत्तम पवार, सर्वोदय साटम, सुरेश राणे, देवदत्त कदम,आदी जि प मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स