ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कणकवलीत मिळणार 'आयुष्यमान भारत ' योजनेचा विशेष लाभ...!

कणकवलीत मिळणार 'आयुष्यमान भारत ' योजनेचा विशेष लाभ...!

प्रकाशन: 04 Oct 2021 08:16 PM
वाचन संख्या 148

आम.नितेश राणे यांचा विशेष पुढाकार ….

कणकवली पं.स. येथे ५ ऑक्टोबर पासून नोंदणी

कणकवली | उमेश परब : आम.नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.या योजनेची सुरवात कणकवली तालुकयात ५ ऑक्टोबर २०२१ राजी स काळी ११.वा पासून कणकवली पंचायत समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या इंदीरा आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या इमारतीमध्ये होणार आहे . या योजनेचा लाभ कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा व यासाठी येताना पात्र लाभार्थी यांनी आपले रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पं.स कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे .

ही योजना ५ ऑक्टोबर २०२१ ते ५ नोव्हेंबर या १ महीन्यांच्या कालावधीत कणकवली तालुकयात राबवीणेत येणार असून याचे नियोजन जि.प.मतदार संघनिहाय करण्यात आलेले असून ते खालीलप्रमाणे जि.प. मतदार संघ जानवलीतील जानवली हुंबरट , साकेडी , तिवरे , बेळणे खु! तसेच कलमठ मतदार संघातील वरवडे , पिसेकामते , कासरल , सातरल , आशिये ,कलमठ या गावांसाठी ५ ते १२ ऑक्टोबर २०२१ असा कालावधी देण्यात आला आहे.

खारेपाटण जि.प. मतदार संघातील तरळे , वारंगांव , शिडवणे , कुरंगवणे , साळीस्ते खारेपाटण,नडगीवे , शेर्पे , चिंचवली,वायंगणी तसेच कासार्डे जि.प.मतदार संघातील नांदगांव , तोंडवली , असलदे , कोळोशी , आयनल कासार्डे , ओझरम , दारूम या गावांसाठी १३ ते २० ऑक्टोबर २०२१ असा कालावधी देण्यात आला आहे.
फोंडाघाट जि.प. मतदार संघातील लोरे नं .१ , घोणसरी , वाघेरी , पियाळी, फोडाघाट व हरकुळ बु . जि.प. मतदार संघातील हरकुळ खु . कोडये , डामरे , गांधीनगर , भिरंवडे , करूळ,हरकुळ बु . नागवे , करंजे गावांसाठी २१ते २८ऑक्टोबर २०२१ असा कालावधी देण्यात आला आहे.

कळसुली जि.प.मतदार संघातील कळसुली , शिरवल , हळवल , कसवण – तळवडे वागदे , ओसरगांव , बोर्डवे व नाटळ जि.प.मतदार संघातील सांगवे , नाटळ , कुंभवडे नरडवे , दिगवळे , दारीस्ते , शिवडांव या गावांसाठी २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२१असा कालावधी देण्यात आला आहे.

आम.नितेश राणे यांचे विशेष प्रयत्नातून कणकवली तालुकयात केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून दिल्याबददल त्यांचे विशेष आभार कणकवली पं.स सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी मानले आहेत. नियोजनाचा लाभ मंजूर यादीमध्ये असणाऱ्या पात्र लाभार्थिनी घ्यावा तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येताना आयुष्यमान योजनेच्या लाभाचे पत्र आले असल्यास ते लाभार्थिनी घेऊन यावे या योजनेचा फायदा जवळपास १३५० आजारांवर होणार असून यामध्ये कणकवली तालुकयातील एकूण २०२१२ पात्र लाभार्थी आहेत . त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा . जेणेकरून या योजनेचा फायदा भविष्यातही या पात्र लाभार्थींना होणार आहे . असे आवाहन सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स