आचरा येथील कार अपघातातील चालकाला मिळाला जामिन.
आचरा हायस्कूल समोर झाला होता कारचा अपघात
आचरा | विवेक परब : अवघ्या जिल्ह्याला हेलावून टाकलेल्या आचरा येथील कार अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी आचरा पोलिस ठाण्यात ,कारचालक कृष्णा राणे (वय 60,जानवली) या संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता.
सदर संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका झाली. आचरा हायस्कूल समोर काल रात्री अपघात घडला होता. कृष्णा राणे यांच्या ताब्यातील गाडी क्रमांक एम. एच. ०७ ए जी ४०२५ याची तीन
पादचाऱ्यांना धडक बसली. यात पोलीस उपनिरीक्षक दीपक
पुरुषोत्तम लोणे,पालघर (सध्या रा. आचरा) वरचीवाडी व जमेंदर प्रसाद रा.आचरा वरचीवाडी या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
अपघातात मयत दीपक लोणे यांची कन्या कु. परी लोणे हीदेखील जखमी झालेली होती.
श्री लोणे व जमेंदर प्रसाद यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक कृष्णा राणे यांच्या विरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना न्यायलयाने जामिनावर मुक्त केले आहे.
आरोपिच्या वतीने एडव्होकेट हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)