ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आमदार नितेश राणेंच्या शिष्टाईनंतर नांदगावतील ठिय्या आंदोलन स्थगित.

आमदार नितेश राणेंच्या शिष्टाईनंतर नांदगावतील ठिय्या आंदोलन स्थगित.

प्रकाशन: 04 Oct 2021 06:41 PM
वाचन संख्या 189

१५ दिवसांत कामे पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन ;आमदार नितेश राणेंचा इशारा..!

कणकवली | उमेश परब : नांदगाव येथे सर्व्हिस रोड तसेच हायवेशी संबंधित विषयांवरून नांदगाववासीयांचे आज सकाळी 11 वाजल्यापासून ठीय्या आंदोलन सुरू होते. संबधित विभागाचे खारेपाटण येथील उपअभियंते श्री. कुमावत यांनी आंदोलनकांना सामोरे जात त्यांना वस्तुस्थिती समजावून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. “अजून किती वेळा आंदोलन करावे?आम्हाला काही कामे नाहीत काय? एकदाचा अंतिम निर्णय द्या, अन्यथा आम्ही हटणार नाही,” असा पवित्रा आंदोलकांमार्फत घेण्यात आला होता. तद्नंतर दुपारी 3 च्या दरम्यान या विभागाचे आम. नितेश राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत चर्चा केली व रस्त्यांच्या व्यतिरिक्त जी कामे पेडींग आहेत, ती त्वरीत सोडवून घेवू व सर्व्हीस रस्त्यांबाबत भूसंपादन झाल्यांनंतर निर्णय होईल. तसेच भूसंपादन प्रक्रीया कुठे थांबली व ती जलद गतीने कशी होईल, यासाठी उद्या सकाळी 11 वा. प्रहार भवन येथे संबधीत विभाग व प्रांत नांदगाव शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे आम. नितेश राणे यांनी बोलताना सांगितले. तसेच सादर कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही संबंधित विभागाला फक्त १५ दिवसांची मुदत देणार आहोत. यानंतर मात्र काय करायचे आहे ते आम्ही आमच्या पध्दतीने करू, असा इशारा देत संबधीत विभागाला आम. नितेश राणे यांनी दिला. राणेंनी 15 दिवसांची डेड लाईन दिल्याने उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये यांनी सांगितले आहे.

आम. नितेश राणे बोलताना पुढे म्हणाले, की आम्ही गेल्या वर्षीही एकत्र येत आंदोलन केले होते. परंतु त्यावेळी संबधित विभागाने दिलेले आश्वासन पाळले नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार जवळ काही विषय प्रलंबित आहेत. यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेन. तांत्रिक विषयांसाठी उद्या प्रहार भवन येथे ११ वा. बैठक घेणार आहे आणि त्यांना १५ दिवसांची डेड लाईन देणार आहे. जर या कालावधीत संबधित प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल. नंतर मात्र प्रशासनाने व पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी घ्यावी, असा इशारा आम. नितेश राणे यांनी दिला आहे.

यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच नीरज मोरये, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर, मजीद बटवाले, गवस साठविलकर, मंगेश पाटील, वृषाली मोरजकर, रेणूका पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भाई मोरजकर, अब्दुल नावलेकर, करीम बटवाले, इक्बाल बटवाले तसेच हायवे बाधीत शेतकरी वर्ग आदी उपस्थित आहेत. तसेच पोलीस निरीक्षक हुंदळेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक के. एस. जाधव तसेच महेते, जांभळे, बावधाने आदी पोलिस कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स