गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने काजू इतर फळ पिकांबद्दल मार्गदर्शनपर कृषि कार्यशाळा संपन्न.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने काजू इतर फळपिकांबद्दल मार्गदर्शनपर कृषि कार्यशाळा संपन्न झाली. श्री. मांणगावकर सर (मास्टर ट्रेनर-यशदा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. श्रीम. खुल्ली मॅडम कृषि सल्लागार ऍग्रो वन, सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम, सदस्य दिक्षा राणे, रोशनी बाणे व इतर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
काजू पिकाच्या नियजनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन, शेतकरी वर्गच्या शंकांचे समाधानकारक मार्गदर्शन यावेळी उपस्थित मार्गदर्शक प्रमुख पाहुण्यांनी केले. कार्यशाळा सभा खेळी मुळीच्या वातावरण संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)