ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
वैभववाडीतील  आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन ; शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार मोफत लाभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वैभववाडीतील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन ; शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार मोफत लाभ.

प्रकाशन: 16 Jun 2023 05:32 PM
वाचन संख्या 194

नवलराज काळे / सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २३ जुन २०२३ दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, अल्सर, थायरॉईड, मुळव्याध, मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथी, मोतिबिंदू, चरबीच्या गाठी, टॉन्सिल्स, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा, गर्भाशयाचे आजार, त्वचा रोग तपासणी इ. आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

गरजुंनी श्री. प्रविण पेडणेकर ८२७५५२४६१६, श्री. सुधिर नकाशे ७७४३९८६०८८, श्री. राजेंद्र राणे ७७७३९३७०७०, श्री. संजय रावराणे- ९४२२३७९३४५, श्री. राजु पवार ९६५७२५९०८० यांच्याकडे आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स