गरजूंसाठी दैवी देणगी ; रोणापाल येथे गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी 'एम फाॅर सेवा' संस्थेच्या दयासागर छात्रालयात प्रवेश सुरु.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘एम फाॅर सेवा’ संस्थेचे दयासागर छात्रालय, रोणापाल , ता. सावंतवाडी येथे मागील १६ वर्षे (कोरोना काळातील अडचण वगळता) नियमित सुरू आहे. या ठिकाणी अत्यंत गरिब गरजू मुलांची मोफत राहून शिक्षण घेण्याची व्यवस्था होते.
चालू शैक्षणिक वर्ष २०२३/२४ मध्ये १५ जुनला शाळा नियमित सुरू झालेल्या असल्याने या वेळी मुला मुलींची दोन्ही छात्रालये नियमित सुरु करावयाची आहेत. गरिब गरजू व माध्यमिक शिक्षण (पाचवी ते दहावी) घेण्यासाठी असमर्थ असलेल्या मुलां व मुलिंसाठीसाठी याठिकाणी निवास न्याहारीची मोफत व्यवस्था करण्यात येते. आपल्या परिसरातील खालील निकषात बसणारी व शैक्षणिक ओढ असणारी अत्यंत गरिब व गरजू मुलां-मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना छात्रालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे.
या प्रवेशासाठी श्री. जिवबा भरत वीर (संपर्क क्रमांक ९४२१२६२७०१) यांच्याशी संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे. या छात्रालयातील प्रवेशासाठी खालील प्राधान्य क्रम/निकष आहेत.
१) आई वडिल नसलेली मुले.
२) एक पालक असलेली मुले
३) व्यसनी पालकांची मुले.
४) गरिबीमुळे अन्न व शिक्षणाची गैरसोय होणारी मुले.
५) गरिब पालकांची मुले.
तरी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांंनी लवकर लवकर प्रवेश घ्यावा अशी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)