ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने कृषी सेवा पुरस्कार सोहळा संपन्न ; पारंपरिक शेतीचा व कृषकाचा अनोखा सन्मान.

आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने कृषी सेवा पुरस्कार सोहळा संपन्न ; पारंपरिक शेतीचा व कृषकाचा अनोखा सन्मान.

प्रकाशन: 11 Jun 2023 02:58 PM
वाचन संख्या 532

दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे यांचे स्मरणार्थ पुरस्कार.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने आज ‘कृषी सेवा पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला लहानपणापासून पारंपारिक शेती,पाण्याचा स्रोत झाल्यानंतर ऊस उत्पादन, फलोत्पादन, विविध संस्थामध्ये क्रियाशीलपणे कार्यरत असलेले आक्रमक व लढाऊ लोकनेते व ‘आबा’ या टोपणनावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले तसेच मंडळाच्या स्थापनेपासून क्रियाशील सहभाग घेऊन मंडळाचे सल्लागार असणारे श्री.मोहन सखाराम रावराणे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते सत्कार मूर्ती श्री.बाबला बाबू शिंगाडे यांना शाल, फेटा, खादीचा हातरूमाल व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्री.बाबलू बाबू शिंगाडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पारंपारिक पद्धतीने आपली वडिलोपार्जित शेती जोपासली. त्याचबरोबर गुरे-ढोरे सांभाळत शेळीपालन ही केले. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली १० वर्षे विद्यमान मंडळाच्या ‘दुर्गाडी दर्शन सोहळा’ या उपक्रमात दुर्गाडीचा परिसर स्वतः पायी फिरून दाखविला. धनगरी नृत्य गज्जा यातही त्यानी लोककलावंत म्हणून काम करून आपली पारंपारिक कला जोपासली. त्यांच्यामुळे दुर्गाडी डोंगराच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा,पायवाटांचा, विशिष्ट जागांचा,वनौषधी वनस्पती आणि झाडाझुडपांचा उलगडा झाला. त्यांनी याकामी मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल ‘श्री.भैरीभवानी कृषी व फलोद्यान विकास सहकारी संस्था (नियोजित) यांच्या सौजन्याने ‘दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे’ यांचे स्मरणार्थ मंडळाच्या वतीने त्यांना गौरवपत्र देऊन कृषी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच आपली पारंपारिक शेती जोपासत स्वतःच्या घरात जेवण बनवून पर्यटकांना जेवू घालणारे तसेच पहिली पाच वर्षे व्यवस्थापक म्हणून काम केलेले श्री.विठ्ठल जठू हुंबे यांचा शाल व खादीचा रुमाल देवून सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला श्री.लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे अध्यक्ष म्हणून लाभले.यांचा मंडळाच्या कार्यात सुरुवातीपासूनच क्रियाशील सहभाग आहे. गेली दहा वर्षे एकहाती दुर्गाडी दर्शन सोहळा कार्यक्रम करत आहेत. पारंपारिक शेती,उस उत्पादक तसेच प्रथितयश बांधकाम ठेकेदार आहेत. ग्राम पंचायत आचिर्णे सदस्य,मा.सभापती पंचायत समिती वैभववाडी अशी राजकीय कारकीर्द आहे. त्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन हुंबे, परिचय स्वप्नील दर्डे व आभार नागेश रावराणे यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून संजय पांगळे यांनी ऊत्तम नियोजन केले.कार्यक्रमास मंडळाचे सल्लागार श्री.मधुकर यशवंत रावराणे, रणजित रावराणे, सखाराम झोरे, राजा शिंगाडे, संतोष बोडके, विजय तेली , महेश रावराणे,सत्यवान पांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स