ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा-डिगवाडी गतिरोधकावर दुचाकीचा अपघात ; विचित्र गतिरोधक हटवायची स्थानिकांची मागणी.

बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा-डिगवाडी गतिरोधकावर दुचाकीचा अपघात ; विचित्र गतिरोधक हटवायची स्थानिकांची मागणी.

प्रकाशन: 11 Jun 2023 06:18 PM
वाचन संख्या 305

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा-डिगवाडी येथे असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आढळून पाठीमागे बसलेल्या रोहिणी गावडे (वय ६५, रा. वेंगुर्ले-अणसूर) या जखमी झाल्या. सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर व स्थानिकांनी तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविले.

मडुरा न्यू इंग्लिश स्कूल समोर रस्त्यावर असलेले गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनत चालले आहेत. त्या ठिकाणी सूचना फलक, फलक तसेच सफेद पट्ट्या नसल्यामुळे गतिरोधक नवख्या वाहनचालकाला लक्षात येत नाही. आज वेंगुर्ले अणसूर येथील रोहिणी गावडे व त्यांच्या मुलाचा अपघात झाला . तिथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर व स्थानिकांनी तात्काळ जखमी माय-लेकाना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविण्यात आले.
दरम्यान गौरेश पटेकर म्हणाले की नवख्या वाहनचालकाला हे विचित्र गतिरोधक सहज लक्षात येत नाहीत. हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे झाला आहे आणि जर गतिरोधकाची देखभाल करण्यास अधिकारी किंवा बांधकाम विभाग सक्षम नसेल तर तात्काळ गतिरोधक हटवावा. कारण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येथूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे एकतर गतिरोधक हटवा किंवा सफेद पट्टे, सूचना फलक, फलक लावा. बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन गतिरोधक निर्धोक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स