ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोकणातील शेतकरी वर्गासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष छेडणार आंदोलन ; आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा इशारा.

कोकणातील शेतकरी वर्गासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष छेडणार आंदोलन ; आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा इशारा.

प्रकाशन: 08 Jun 2023 08:18 PM
वाचन संख्या 398

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्रात राज्यस्तरावर कृषी यांत्रिकीकरण योजना राबिविली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ५० % अनुदानावर शेती अवजारे लॉटरी पद्धतीने दिली जात आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्यात ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन यंत्रांची लॉटरी निघणार आहे. या दोन्ही यंत्रांचा उपयोग कोकण पट्ट्यात केला जात नाही. याऐवजी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची मागणी शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये कोकण विभागासाठी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची लॉटरी पहिल्या टप्प्यात काढण्यात यावी जून-जुलै महिन्यापर्यंत हि लॉटरी न काढल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.

कोकणात शेतकरी वर्गाचे ‘प्रमुख पीक हे भात पीक’असून मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. कोकणात छोट्या वाफ्यांमध्ये भात बियाण्यांची पेरणी केली जाते त्यासाठी यंत्राचा उपयोग केला जात नाही. मात्र जमिनीची मशागत करण्यासाठी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या यंत्रांना शेतकऱ्यांची मागणी देखील मोठी आहे. २०२१ ते २०२४ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडरसाठी शेतकऱ्यांचे ७८५२ अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत. भात पिकाचा हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांना पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर मिळाले तर त्याचा उपयोग त्यांना होणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या पहिल्या टप्प्यात घेतलेली ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन्ही यंत्रांचा वापर राज्यातील इतर भागात केला जातो. मात्र कोकणात या यंत्रांचा वापर होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कृषी यंत्रे योग्य वेळी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जून-जुलै महिन्यापर्यंत पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची लॉटरी पहिल्या टप्प्यात काढण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स