ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माजी खासदार डाॅ निलेश राणे इफेक्ट ; आचरा खार बंधार्याची नादुरुस्त झडपे लगेच दुरुस्त.

माजी खासदार डाॅ निलेश राणे इफेक्ट ; आचरा खार बंधार्याची नादुरुस्त झडपे लगेच दुरुस्त.

प्रकाशन: 20 May 2023 02:47 PM
वाचन संख्या 374

आचरा | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी खासदार व नेते डाॅ निलेश राणे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना दिलेल्या सूचनांचा तत्काळ परिणाम मालवण तालुक्यातल्या आचरा इथे घडून आला. आचरा गाऊडवाडी, काझ़ीवाडा, भंडारवाडी आणि डोंगरेवाडी येथे खाजन स्वरुपातील क्षेत्राच्या खार बंधार्याची झडपे ( झाकणे) तुटून खाडीचे पाणी भातशेती जमीन क्षेत्रात घुसल्याने अंदाजे शेकडो एकरची जमीन बाधीत झाली होती. याबाबतची माहिती मिळताच नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणेंनी तिथे प्रत्यक्षात भेट देत ती नादुरुस्त झडपे तत्काळ दुरुस्त करायच्या सूचना संबंधित खारभूमी विकास विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना दिल्या होत्या. खारभूमी विकास विभागाचे सहाय्यक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांना नादुरुस्त झडपे तात्काळ दुरुस्त करण्याबाबत तसेच योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना मिळाल्यानंतर दोनच दिवसांत एक मोठा ‘भात शेतीजमीन बाधीत होण्याचे संकट ‘ दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, माजी जि.प.सदस्य जेराॅन फर्नांडिस, शक्तीकेंद्र प्रमुख जगदीश पांगे व इतरांनी याबाबत संबंधित विभागाची प्रशंसा केली असून माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी देखील दूरध्वनी द्वारे संबंधित यंत्रणेचे आभार मानले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

फोटो सौजन्य | आचरा ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स