ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
यंदा मान्सूनच्या वेळेत सक्रीयतेबाबत बाबत सुखद व अनुकूल स्थिती असल्याचे तज्ञांनी केले स्पष्ट.

यंदा मान्सूनच्या वेळेत सक्रीयतेबाबत बाबत सुखद व अनुकूल स्थिती असल्याचे तज्ञांनी केले स्पष्ट.

प्रकाशन: 20 May 2023 04:53 PM
वाचन संख्या 417

पुणे | ब्यूरो न्यूज : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून ३ दिवस आधीच अंदमानसह बंगालच्या उपसागरात १९ मे रोजी दुपारी २ च्या दरम्यान दाखल झाला होता. आता मान्सून आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. येत्या ३ दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेट क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

मान्सून केरळात ४ जून रोजीच येणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मान्सूनचे अंदामानात आगमन २२ मे रोजी झाले होते. मात्र, तो यंदा २० मे पर्यंत येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून १९ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास दाखल झाला. तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी ही सुखद वार्ता दिली. मान्सून अंदमान सागरासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे. यापुढे तो बंगालच्या उपसागरासह अंदामान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले.

गेल्या वर्षी मान्सून २२ मे रोजी अंदमानात आला होता. यंदा तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे केरळात तो लवकर येईल असा अंदाज आहे. या बाबत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांना विचारले असता ते म्हणाले की मान्सूनच्या वाऱ्याची दिशा व गती यावर त्याच्या पुढच्या प्रवासाचे अंदाज दिले जातात. तो अंदमानात लवकर आला म्हणजे केरळात लवकर येईल, असा अंदाज बांधता येत नाही. तो केरळात ४ जून रोजीच दाखल होईल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. गोवा व कोकण किनारपट्टीवर देखील मान्सून वेळेवर सक्रीय होईल असेही पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स