श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकितील निर्णय.
पुणे | ब्युरो न्यूज : पुणे नियोजन समितीच्या बैठकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे तर चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, धिकारी डॉ.राजेश देशमुख, नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)