ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
घावनळे शाळेच्या गरजांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटीबद्ध : आ.वैभव नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

घावनळे शाळेच्या गरजांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटीबद्ध : आ.वैभव नाईक.

प्रकाशन: 06 May 2023 08:58 PM
वाचन संख्या 272

जि.प.प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आ.वैभव नाईक यांनी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून केले संबोधीत.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनळे प्राथमिक शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून अनेकांनी या शाळेसाठी योगदान दिले आहे. या शाळेत माध्यमातून ५० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले आहेत.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अव्वल आहे.शाळेचे ऋण फेडण्यासाठी पुढील काळात शाळेसंबंधित प्रत्येकाने शाळेला सहकार्य करणे गरजेचे आहे. शाळेच्या शैक्षणिक गरजांबरोबरच भौगोलिक तथा मूलभूत भौतिक गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून शाळेच्या सहकार्यासाठी आपण सर्वोतपरी कटीबद्ध असल्याचे आ. वैभव नाईक यांनी जि. प. प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनावेळी संबोधीत करताना सांगितले . या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार वैभव नाईक यांनी भूषविले होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक,दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, लवू म्हाडेश्वर,दाजी धुरी, सुनील खोचरे, वासू खोचरे, उत्तरा पिळणकर, हरिशचंद्र खोचरे, दीपक सावंत, सोनिया मुंज, नंदू म्हाडेश्वर, सद्गुरू घावनळकर, श्रीधर खोचरे, श्री. पाटील सर, अनुप्रीती खोचरे, ऍड. सीमा बोभाटे,नाना राणे, धर्मा सावंत यांच्यासह शिक्षक, कर्मचारी घावनळे ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स