ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी माध्यमीक विद्यालयात रा.छ.शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता सोहळा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळशी माध्यमीक विद्यालयात रा.छ.शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता सोहळा संपन्न.

प्रकाशन: 06 May 2023 03:39 PM
वाचन संख्या 249

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे छत्रपती रा.छ.शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी सांगता सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी सुरवातीला मुख्याध्यापक -माणिक वंजारे,स.शिक्षक- संजय मराठे व पुरुषोत्तम साटम , भिसे या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच या सर्वांच्यां उपस्थितीत रा.छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प हार घालून मा.अध्यक्ष -प्रज्ञा घाडी- -विद्यार्थिनी प्रतिनिधी हिने पूजन केले व सर्वांनी शाहू महाराज यांना आदरांजली वाहिली.

विद्यार्थ्यां पैकी केतकी साळसकर हिने रा.छ. शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. स.शिक्षक-मराठे यांनी आपल्या भाषणात रा.छ. शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित अनेक बाबी प्रकट केल्या. मुख्याध्यापक -माणिक वंजारे यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगताना समानतेच्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर,म.फुले यांच्या सारखे यांनी काम केल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दमयी साळसकर हिने केले. शेवटी आभार प्रदर्शन नम्रता पवार हिने केले. या पूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुमन लब्धे या विद्यार्थिनीने केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स