कुणकेश्वर येथील माजी केंद्रप्रमुख रवींद्र तेली यांचे निधन
संतोष साळसकर | शिरगांव: देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावचे प्रतिष्ठित रहिवाशी तथा राजापूर तालुक्यातील माजी केंद्रप्रमुख रविंद्र सहदेव तेली ( ६१ ) यांचे शुक्र. दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, १ भाऊ, १ बहिण, पुतणी असा मोठा परिवार आहे. रविंद्र तेली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील काजुर्ली गावातील शाळेतून आपली शिक्षकी पेशा सुरू केली. ३६ वर्षे त्यांनी शिक्षकी सेवा केली. २०२० साली ते राजापूर तालुक्यातून केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
सामाजिक कार्याची त्यांना आवड होती.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राजापूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम तेली यांचे ते बंधू , कुणकेश्वर येथील अंगणवाडी सेविका सौ. शुभांगी तेली यांचे दिर, तर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित, देवगड तालुक्यातील मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. सोनाली तेली – जाधव यांचे ते सख्खे काका होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)