ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भंडारी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावि!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भंडारी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावि!

प्रकाशन: 30 Apr 2023 08:42 PM
वाचन संख्या 54

भंडारी महासंघाचे अध्यक्ष मामा माडये यांचे प्रतिपादनकट्टा येथे भंडारी समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मसुरे | प्राजक्तापेडणेकर : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे आजच्या तुमच्या उपस्थिती वरून दिसत आहे. सर्व समाज बांधव एवढ्या तळमळीने एकत्र आले हे पाहून समाज बांधवांचा अभिमानही वाटतोय. आगामी काळात भंडारी समाज पुढे नेण्यासाठी युवा समाज बांधवांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आमची सदैव साथ त्यांना असेल. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर असणे ही आपल्या समाजाची ओळख आहे. ही ओळख अशीच कायम ठेवण्यासाठी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावि असे आवाहन भंडारी महासंघाचे अध्यक्ष वासुदेव उर्फ मामा माडये यांनी कट्टा येथील आयोजित भंडारी समाजाच्या मेळाव्या दरम्यान बोलताना केले.

मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज कट्टा यांच्यावतीने सत्कार समारंभ व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मामा माडये यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्री गणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा भंडारी संघाचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, माजी जिल्हा सचिव राजू गवंडे, सुनील नाईक, वासुदेव पावसकर, सतीश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप आवळेगावकर, रमेश वाईरकर, दिलीप वेंगुर्लेकर, अशोक पराडकर, श्रद्धा केळुस्कर, मनीषा वराडकर, बाबुराव मसुरकर, उदय वायंगणकर, सपना पावसकर, सौ. नार्वेकर, सौ. खोत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांच्यावतीने पंचक्रोशीतील कट्टा, पेंडूर, काळसे, धामापूर, आंबेरी, चौके, कुणकवळे, गोळवण, वडाचा पाट, गावराई, मसुरे, नांदोस, वराड, तळगाव, सुकळवाड या भागातून निवडणुकीत विजयी झालेले सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, आजी माजी सभापती, उपसभापती, सरपंच उपसरपंच, ग्रा. प. सदस्य यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी वासुदेव पावसकर, सुनील नाईक, बाबुराव मसुरकर, सपना पावसकर, सौ खोत, सौ नार्वेकर, मसुरे येथील वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिचा शैक्षणिक व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती श्वेता तेंडुलकर, सोनाली पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. भंडारी समाज एकत्रित करून पुन्हा नव्याने समाजाला उभारी देणारे व मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे समाज बांधव मंगेश माडये, निलेश हडकर, सुरेश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप मिठबावकर, विशाल वाईरकर, प्रकाश सरमळकर, विद्याधर चिंदरकर, गणेश विजय वाईरकर, गणेश रमेश वाईरकर, वासुदेव पावसकर, अशोक पराडकर, संजय नाईक, झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आनंद वराडकर, लता खोत, सतीश वाईरकर, अजय मयेकर, मंदार वराडकर, मनमोहन डीचवलकर सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण सचिव पंकज पेडणेकर, संचालक मिलिंद झाड, भाऊ साळगावकर, अजित गवंडे , सचिन गवंडे बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी तर प्रस्ताविक प्रदीप मिठबावकर, आभार प्रकाश सरमळकर यांनी मानले.सदर मेळाव्यात समाजातील विवाह इच्छुक युवक आणि युवती यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे साडेतीनशे जणांनी आपली माहिती यावेळी नोंदविली आहे. यापुढील कालावधीत याबाबत अधिक माहिती साठी इच्छुक समाज बांधवांनी ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स