ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे मोफत -वह्या, गणवेश व पुस्तके वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे मोफत -वह्या, गणवेश व पुस्तके वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रकाशन: 28 Apr 2023 02:24 PM
वाचन संख्या 147

संतोष साळसकर | शिरगांव: देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे शैक्षणिक वर्ष-2023-2024 मध्ये इ.8 वी इयत्तेत नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमार्फत मोफत वह्या, पुस्तके व गणवेश वाटपाचा कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला.यानंतर इ.9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना ही मोफत वह्या वाटप प्रमुख उपस्थितीच्यां हस्ते करण्यात आले .

सदरच्या कार्यक्रमामध्ये स्कूल कमिटी चेअरमन – सत्यवान सावंत व उपाध्यक्ष – प्रभाकर साळसकर यांनी उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन पर विचार आपल्या भाषणात सांगितले.

सदरच्या कार्यक्रमामध्ये स्कूल कमिटी- चेअरमन- सत्यवान सावंत, उपाध्यक्ष-प्रभाकर साळसकर, मुख्याध्यापक – माणिक वंजारे, संस्था सदस्य – संतोष आ.साळसकर, रविंद्र साळसकर,चाफेड पोलीस पाटील – संतोष सावंत, चाफेड गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रविण राणे ,साळशी माजी सरपंच – विशाखा साळसकर, सहाय्यक शिक्षक संजय मराठे साटम सर,तसेच मोरे, भिसे इत्यादि च्या हस्ते वह्या, पुस्तके व गणवेश वाटप इ.8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमांसाठी साळशी,चाफेड,भरणी,माईण या पंचक्रोशीतील अनेक पालक , ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स