कट्टा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणमध्ये 'सुट्टीची मजा' शिबिराचा शुभारंभ..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराचा शुभारंभ झाला. सहा दिवसीय शिबीराचा आनंद धुत्रे गुरुजींनी कथा सांगून शुभारंभ केला. नांदोसकर गुरुजींनी मुलांना कागदापासून बनवणारे विविध प्रकार दाखवले.
किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, आनंद धुत्रे, अर्चना धुत्रे, मनोज काळसेकर, अर्जून पेंडूरकर, वैष्णवी लाड, मनोज काळसेकर, प्रियांका भोगटे, नम्रता पावसकर, श्रीधर गोंधळी, नाईक मॅडम, पालक उपस्थित होते. विलास बांदेकर यानी मुलांना अल्पोपहार दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)