पावशीतील सोहम तेजस स्पोर्टस आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन स्पर्धेला दिल्या शुभेच्छा.
बॉयफ्रेंड कुडाळ संघ ठरला अव्वल तर किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ संघ संघ उपविजेता.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ‘सोहम तेजस स्पोर्टस’ च्या वतीने पावशी शेलटेवाडी येथे भव्य केपीएल बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा २१ ते २३ एप्रिल दरम्यान खेळवली गेली झाली. या स्पर्धेप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. प्रेक्षणीय सामन्याची नाणेफेक त्यांच्या हस्ते करण्यात आली.
या स्पर्धेत बॉयफ्रेंड कुडाळ संघ अव्वल ठरला तर द्वितीय क्रमांक किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ,तृतीय क्रमांक गवळदेव सेव्हन, चतुर्थ क्रमांक देवेंद्र स्मृती कुडाळ यांनी पटकावला.
त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सोहम तेजस स्पोर्टस अध्यक्ष महेश आळवे,पावशी ग्रा. प सदस्य काका भोगटे, युवासेना उप तालुकाप्रमुख सागर भोगटे, अमित राणे,गुरु गडकर,शैलेश काळप, प्रसाद शेलटे, निलेश आळवे, कृष्णा आळवे, सदा अणावकर, राजू पाटणकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)