दक्ष पोलिस टाईम्स विशेषांकाचे लोकार्पण व नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्या २६ एप्रिलला ; एकनिष्ठ व प्रामाणिक प्रतिनिधींचा होणार विशेष सन्मान. ( विशेष )
मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : गेली अडिच दशके सामाजिक स्तरावर अथक काम करणार्या ‘दक्ष पोलिस टाईम्स’ या सुप्रसिद्ध साप्ताहिकाचे सामाजिक योगदान सर्वश्रुत आहे. उद्या दक्ष पोलिस टाईम्स या साप्ताहिकाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
दक्ष पोलीस टाइम्सच्या या सोहळयाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीरा-भाईंदर झोन (१) चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे असतील तर कार्यक्रमाचे उद्घाटन भा.ज.पा.चे माजी आमदार तथा मीरा – भाईंदरचे माजी महापौर नरेंद्र मेहता यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार वितरण मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त गुन्हे विभागाचे अविनाश अंबुरे यांच्या हस्ते होणार आहे.
दक्ष पोलीस टाइम्स २५ वर्षांपासून जनता व पोलीस यांच्यामधील महत्त्वाच्या दुवा ठरलेले असून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा राज्यात सर्वाधिक प्रमाणात वितरित होणारे एकमेव साप्ताहिक असून अन्याया विरुध्द, भ्रष्टाचाराविरुध्द पेटून उठणारे, आवाज उठविणारे जागरूक वृत्तपत्र असून कर्तव्य – दक्ष अधिकाऱ्यांचे सन्मान करणारे अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून संबंध महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक परिसरात प्रसिद्ध आहे.
उद्या २६ एप्रिलला ‘दक्ष पोलीस टाइम्स कार्यालयाचे मुंबई ठाणे परिसरातील काशिमिरा येथे उद्घाटन होणार असून या सोहळ्यात एकनिष्ठ व प्रामाणिक प्रतिनिधींचा स्मृति चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने उद्या२६ एप्रिलला श्री. सत्यनारायण पूजा व अल्पोहाराचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला असून सायंकाळी ४ ते पासून सर्वांना निमंत्रीत करण्यात आले आहे. हे आग्रहाचे निमंत्रण आवाहन दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक विजय टाटीया, मुख्य संपादक किरण सावंत, कार्यकारी संपादक राकेश पाटील, मानद संपादक महेंद्र दळवी, मुंबई ठाणे दहिसर विभाग प्रमुख मिकीन गुप्ता, राज्य सल्लागार मोहम्मद शमीम खान तसेच समस्त दक्ष पोलीस टाइम्स समूह व मराठी विकास पत्रकार संघ परिवार यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)