ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सोनवडेपार-वराड पुलाच्या कामाची खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सोनवडेपार-वराड पुलाच्या कामाची खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी.

प्रकाशन: 24 Apr 2023 07:04 PM
वाचन संख्या 187

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या स्पष्ट सूचना.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे. मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते.त्यासाठी देखील खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून काम सुरु करून घेतले. आज या पुलाच्या कामाची पाहणी खा.विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली.

ठेकेदार व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.रस्त्याच्या कामांमुळे माडाच्या झाडांचे नुकसान होणार आहे त्यासंदर्भात देखील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहाय्यक अभियंता श्री. माळगावकर,किशोर भगत, आपा आळवे, हरिश्चन्द्र पवार, अनिल परब, सोमा परब, वराड सरपंच शलाका रावले, किशोरी भगत, शिवाजी चव्हाण, गोपाळ परब, राजू घाडी, आपा परुळेकर, अशोक परब, अमित आंबेकर, बाळा गावडे, कमलाकर परब, विनोद आळवे,बाबू टेंबुलकर यांच्यासह वराड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते.


विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स