चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कास उपकेंद्राला सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत विविध औषधांचे वितरण.
बांदा | राकेश परब : महाभयंकर अशा कोरोना कालावधीत गांवातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भविष्यात कास गांवचे आरोग्य जपण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.
चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कास उपकेंद्रास सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत विविध औषधांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. उपसरपंच गजानन पंडित, ग्रा.पं. सदस्य रुक्मिणी पंडित, निकिता कासकर, श्रेया राणे, ग्रामसेवक विनय धाकोरकर, सीएचओ प्रतीक्षा गावित आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)