बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तथा शिंदे गटाच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी विजय देसाई यांची नियुक्ती.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे गांवचे सुपुत्र तथा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य विजय शंभा देसाई यांची बाळासाहेबांची शिवसेना तथा शिंदे गट इन्सुली उपविभाग प्रमुखपदी (शेर्ले पंचायत समिती) नुकतीच निवड झाली. तसे पत्र त्यांना सचिव श्री मोरे (महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी त्यांना दिले आहे. यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री.अशोकराव दळवी,महिला जिल्हा प्रमुख सौ.निता सावंत,कविटकर सावंतवाडी तालुका प्रमुख श्री नारायण राणे,उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई व इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार व ८०% समाजकारण हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते यांच्याशी प्रामाणिक पोहोचवण्यासाठी काम करेन अशी नियुक्ती नंतर श्री.विजय देसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विजय देसाई हे शिवप्रेमी म्हणून परिचीत असून त्यांनी श्री साई समर्थ ट्रक चालक-मालक संघटनेचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतील त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)