ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आजपासून कासार्डे हायस्कूल येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबिराला सुरवात.

आजपासून कासार्डे हायस्कूल येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबिराला सुरवात.

प्रकाशन: 15 Apr 2023 02:08 PM
वाचन संख्या 97

संतोष साळसकर | सहसंपादक : शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग आयोजित, वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशन च्या सहकार्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आज शनिवार १५ एप्रिल पासून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे जिल्हास्तरीय पंच परीक्षा शिबिराला दुपारी २ वाजता सुरवात झाली आहे. हे पंच परीक्षा व शिबिर आज शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरू राहणार आहे.

या शिबिराचा प्रारंभ कासार्डे शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष बयाजी बुराण, कार्याध्यक्ष शैलेश नाईक, सचिव दिनेश म्हाडगुत, कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे प्र.अध्यक्ष ॲड.अजित गोगटे, वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रावराणे, जिल्हा पदाधिकारी मार्टीन अल्मेडा, संजय पेडणेकर, राष्ट्रीय पंच सुहास पाटील (रायगड), मनोज जाधव (सातारा), संतोष भोसले (रत्नागिरी),
अजित पाटील (कोल्हापूर,) व मधुकर पाटील (सिंधुदुर्ग), व कासार्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदी मान्यवर उपस्थित आहेत.

(फोटो | प्रातिनिधिक)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स