ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स वर निसटता विजय ; आयपीएल २०२३ मधले सलग ३ दिवस ३ सामने अखेरपर्यंत रंगले.

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स वर निसटता विजय ; आयपीएल २०२३ मधले सलग ३ दिवस ३ सामने अखेरपर्यंत रंगले.

प्रकाशन: 11 Apr 2023 11:51 PM
वाचन संख्या 407

क्रीडा | सुयोग पंडित : आयपीएल २०२३ चा थरार सलग तीन दिवस अनुभवता आला. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा निसटता पराभव करून सामन्यात विजय मिळवला आहे.

पियुष चावला ( परिणामकारक गेलंदाजी )

मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी आणि अखेरच्या चेंडूवर पराभव केला. आता आयपीएल २०२३ मधील त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे. दिल्ली कॅपिटल्सच होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी देखील कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दिल्ली विरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली.

दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीसाठी मैदानात कर्णधार डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण चौथ्या षटकांत १५ धावा करून पृथ्वी शाॅ बाद झाला. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने ५१, मनीष पांडेने २६, पटेलने जलद ५४ धावांचे योगदान दिले. तर दिल्लीच्या इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर रिले मेरेडिथने २ आणि ऋतिक शौकीनने १ बळी घेतला. दिल्ली कॅपिटल्सने सर्व बाद १७२ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी ओपनिंगसाठी मैदानात आली. यात आठव्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला ईशान किशनची विकेट घेण्यात यश आले. परंतु त्यानंतर कर्णधार रोहितने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रोहितने आयपीएल कारकिर्दीतील त्याचे ४१ वे अर्धशतक ठोकले. त्याला तिलक वर्माने ४१ धावा करत जबरदस्त साथ दिली. पण तरी सामना शेवटपर्यंत ताणला गेला. टीम डेव्हीड व कॅमेरून ग्रीनने फटकेबाजी करत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला त्यांचा आयपीएल २०२३ चा पहिला विजय मिळवून दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स