मसुरे केंद्र शाळेच्या कु. मानसी मुळये हिचे निबंध स्पर्धेत सुयश.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मसुरे केंद्र शाळेची इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. मानसी मुकेश मुळये हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. यावेळी मुकेश मुळये, गुरुनाथ ताम्हणकर, उमेश खराबी, श्रीमती मगर मॅडम, श्री गावडे सर, विनोद सातार्डेकर असे शिक्षक, पालक व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)