ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा-वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत तर्फे आयोजित मोफत नेत्रचिकीत्सा,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा-वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत तर्फे आयोजित मोफत नेत्रचिकीत्सा,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.

प्रकाशन: 10 Apr 2023 05:12 PM
वाचन संख्या 165

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे हस्ते उद्घाटन.

विवेक परब | ब्यूरो चीफ : केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नाम. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालय येथे मोफत नेत्रचिकीत्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, मठ सरपंच सौ.रुपाली नाईक, महिला मोर्चाच्या सौ.स्मिता दामले, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपसरपंच महादेव गावडे, युवा नेते अजित नाईक, नेत्रचिकीस्ता अधिकारी आर.बी.तेली, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ ( भाऊ ) गडेकर, शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, ग्राम.पं.सदस्य संतोष वायंगणकर व शमिका धुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मनिष दळवी म्हणाले की वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम केले जातात परंतु नेत्रचिकीत्सा शिबीर आयोजित करून नविन दृष्टी देण्याचे पुण्याचे काम या शिबीराच्या माध्यमातून केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक आहे. तसेच भाजपाच्या माध्यमातून भविष्यातही असेच लोकपयोगी उपक्रम आयोजित करावे असे आवाहन केले.

शिबीराच्या उद्घाटनानंतर मठ सरपंच रुपाली नाईक व महीला अध्यक्षा स्मिता दामले व उपस्थित महीलांच्या हस्ते केक कापून नाम. नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मठ बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी, महेश धुरी, प्रशांत बोवलेकर, नितिश कांबळी, सुरेश धुरी, स्वप्नील धुरी, लक्ष्मी परब, प्रकाश मोबारकर, कविता घोलेकर, नारायण सावंत, समीर नाईक, प्रसाद मठकर, पपु मठकर, कानु गावडे, सुकन्या तेंडोलकर, सुनील गावडे, धुरी इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रविंद्र खानोलकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स